Ad will apear here
Next
‘सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून कळेल खगोलशास्त्राची व्याप्ती’
पुणे : ‘अणू आणि रेणू या लहान कणांचे विश्व व्यापक आहे. उच्च प्रतीच्या ऊर्जेच्या साह्याने आपण विश्वातील या लहानातील लहान कणांना पाहू शकतो. अवकाशातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी हे सूक्ष्म कण उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे येत्या काळात या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून खगोलशास्त्रातील माहितीची अनेक नवीन दालने उघडली जातील व त्याची व्याप्ती कळण्यास मदत होईल,’ असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) या संस्थेतील भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सौरभ दुबे यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद, आयसर आणि गरवारे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील सभागृहात रंगलेल्या ‘सायन्स गप्पां’मध्ये ‘आपल्या विश्वातील सर्वांत लहान तुकडे’ या विषयावर डॉ. सौरभ दुबे बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे होते. ‘आयसर’च्या प्राची पासलकर, विनय र. र. या वेळी उपस्थित होते.

डॉ. सौरभ दुबे म्हणाले, ‘इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे विश्वातील लहान घटक आहेत. अणू मोकळे असतात. अणूपासून रेणू बनतात आणि रेणूचेही तुकडे करता येतात. अणूच्या केंद्रातच प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अस्तित्व असते. गुरुत्वीय लहरींमध्येही अणू आणि रेणूची महत्त्वाची भूमिका असते. उच्च ऊर्जेच्या वापरातून विश्वातील सूक्ष्म कणांच्या अंतरंगाचे नव्या दृष्टिकोनातून आकलन करणे शक्य होणार आहे.’

यशवंत घारपुरे म्हणाले, ‘मराठी विज्ञान परिषद समाजामध्ये विज्ञान रुजवण्यासाठी सातत्याने विज्ञानविषयक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. आपली मराठी भाषा आणि विज्ञान यांचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.’ 

प्राची पासलकर यांनी प्रास्ताविक केले. विनय र .र. यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZNSBD
Similar Posts
डॉ. सौरभ दुबेंशी गप्पा पुणे : मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर)   आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. सौरभ दुबे यांच्याशी संवाद साधण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध झाली आहे. आज,
‘सायन्स गप्पा’ कार्यक्रमात ‘ओशियनोग्राफी’वर चर्चा मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात, विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. रजनी पंचांग यांच्याशी संवाद साधता येणार आहे. ११ ऑगस्ट २०१७
‘ज्यू लोकांना समाजकल्याणाचा मोठा वारसा’ पुणे : ‘पुण्यातील ससून हॉस्पिटल, निवारा संस्था, मुंबईतील काळा घोडा, मशीद बंदर, कोकणातील अनेक प्रार्थनास्थळे पाहिल्यानंतर ज्यू समाजाच्या वास्तुरचनेचा वारसा आपल्या लक्षात येतो. एवढेच नव्हे, तर या आणि अशा सामाजिक कार्यात ज्यू लोकांनी दिलेले योगदान आणि मराठी भाषा-संस्कृतीशी असलेली नाळ पाहता त्यांचा समाजकल्याणाचा
‘सायन्स गप्पा’मध्ये डॉ. विनिता बाळ पुणे : मराठी विज्ञान परिषद व ‘आयसर’तर्फे ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘जीवविज्ञान–एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर हा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.  पुण्यातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language